यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील चिंचोली येथील माजी सरपंच अनिल सोळुंखे यांच्या सहकार्याने गावात दोन शवपेट्यांचे लोकार्पण नुकतेच गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
लोकार्पण करण्यात आलेल्या शवपेट्या ह्या गावातील विविध कार्यकारी सोसायटीत ठेवण्यात येणार आहे. चिंचोली तालुका यावल या गावात होती शित शवपेट नव्हती, कोणाचा मृत्यू झाल्यास व अंतयात्रा उशिरा करायची असल्याने इतर गावातून शित शवपेटी आणावी लागत होते. शवपेटी गावात असावी अशी मागणी चिंचोली येथील गावकऱ्यांनी केली होती. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता येतील माजी सरपंच अनिल साळुंके यांच्या सहकार्याने दोन शवपेट्या आणण्यात आले असून आज रविवारी ५ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण करण्यात आले आहे.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सोळुंके, किरण सोळुंखे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य देविदास कोळी, विकासोचे माजी चेअरमन पंढरीनाथ कोळी, माजी सरपंच अनिल सोळुंके, उपसरपंच जयवंत साठे, शिवसेनेचे गोपाल चौधरी, भाऊसाहेब धनगर, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सोळुंके, शरद सोळुंखे प्रभाकर सोळुंके, पप्पू देसले, ग्रामपंचायत कर्मचारी अरुण सपकाळे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.