मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विद्यूत खंब्यावरील ताण दिलेल्या तारेला स्पर्श झाल्याने लागलेल्या विजेच्या धक्क्याने म्हशीचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना निमखेडी खुर्द गावात घडली आहे.
प्रशासनाच्या व वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे ट्रान्सफॉर्मरला आणून ठेवल्या जाणाऱ्या तारामध्ये वीज प्रवाह उतरून म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. मुक्ताईनगर पासून जवळच असलेल्या निमखेडी खुर्द या गावांमध्ये ट्रांसफार्मरची डीपी असून महावितरणचे याकडे सपशेल दुर्लक्ष झालेले आहे. गावातील जनतेने वारंवार महावितरण कडे तक्रारी करून देखील याची दखल घेतल्या गेली नाही आज त्याचे परिणाम दिसत आहेत असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. विजय रुस्तम घोडके यांच्या मालकीची असलेली गर्भवती म्हैस ट्रांसफार्मर जवळ चारा खात असताना अचानक विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडली. तरी शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी ही सर्वांची मागणी होत आहे