डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे वाघ नगरातील तरूणाचा मृत्यू; भावाचा आरोप (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । वाघ नगरातील ३० वर्षीय तरूणाचा छातीत दुखत असल्याने त्याच्यावर डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत तरूणाच्या नातेवाईकांनी केला आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात पोलीसांची मोठी गर्दी जमली होती.

सविस्तर माहिती अशी की, नरेंद्र चंद्रकात परदेशी (वय-३०) रा. वाघनगर हा तरूण मोठा भाऊ चेतन यांच्यासोबत त्याचे मोठे काका दिनेश रूपचंद परदेशी यांच्याकडे राहतात. नरेंद्र परदेशी हा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोवीड कक्षात लॅबमध्ये वार्डबॉय म्हणून गेल्या तीन वर्षांपासून काम करतोय. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याला चक्कर येवून छातीत दुखायला लागले. त्याला त्याच्या भाऊ चेतन व काकाचा मुलगा  विशाल यांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी नरेंद्रचा भाऊ चेतन याने येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मरगळ यांना तपासणी करण्याचे सांगितले. मात्र आपली ड्युटी संपली असल्याचे सांगून  वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मरगळ तेथून निघून गेले. आणि त्यातच नरेंद्र परदेशी याचा मृत्यू झाला. भावाचा मृत्यू झाल्याचे पाहून चेतन परदेशी यांच्यासह नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी गोंधळ घातला. हा गोंधळ दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू होतो. 

जिल्हा शासकीय रूग्णालयात गोंधळ होत असल्याने जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी  जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. तरीही मयत नरेंद्र परदेशी यांचे नातेवाईक यांनी गोंधळ सुरूच ठेवला. सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे, शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मयत नरेंद्र परदेशीच्या पश्चात मोठा भाऊ चेतन, वहिनी व पुतण्या असा परिवार आहे. 

 

Protected Content