जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इस्लामपुरा भागातून तरुणाची बुलेट मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे शनिवारी १४ डिसेंबर रोजी ९.३० वाजता समोर आली आहे. याबाबत सोमवारी १६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, कुरेशी शेख अश्फाक शहा वय-२१, रा. इस्लामपुरा जळगाव या तरुणाने त्याच्या मालकीची बुलेट दुचाकी क्रमांक (एमएच १९ ईसी ४६४६) ही त्याच्या घरासमोर शनिवारी 14 डिसेंबर रोजी मध्यरात्री २ वाजता पार्किंगला लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही बुलेट दुचाकी चोरून नेली. ही घटना सकाळी ९.३० वाजता उघडकीला आली. त्याने दुचाकीचा शोध घेतला. परंतु दुचाकी संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर सोमवारी १६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता शनिपेठ पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक भागवत शिंदे हे करीत आहे.