दिपनगर येथे कामगाराचा मृत्यू

भुसावळ प्रतिनिधी । दिपनगरातील वीजनिर्मिती केंद्रातील बंकर येथील बेल्टवर पडल्याने एका कंत्राटी कामगाराचा जागीच मुत्यु झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक बाबुराव हटकर (वय५८ रा. फेकरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील २१० वीज निर्मिती केंद्रांमध्ये असलेल्या बंकरमध्ये कन्वेह्यर बेल्टवर कंत्राटी या कामगाराचा मृत्यू झाला असून भुसावळ येथील ट्रामा सेंटर येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

परंतू ही घटना नेमकी कशी झाली काय झाली, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सदर कर्मचारी हा सफाई कामगार असल्याची माहिती मिळली असून तो कन्व्हेअर बेल्टवर कसा गेला आणि अडकला कसं यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रात्रीच्या वेळी याठिकाणी काय सुरक्षा व्यवस्था असते की नाही याबाबत चर्चा होत आहे.

 

 

Protected Content