विषारी पदार्थ सेवन केलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

suside

 

जळगाव प्रतिनिधी। विषारी पदार्थ सेवन केलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील एका व्यक्तीचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रुक येथील रहिवासी गणेश महादेव पाटील (वय 40) हा शेती काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास राहत्या घरी फवारणीचे विषारी औषध सेवन केले होते. ही माहिती वडील महादेव काशीराम पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केले होते. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे गणेशाला जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात रात्री १२ वाजेच्या सुमारास उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतू आज सकाळी १० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान गणेश पाटील याचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेशच्या पश्चात आई अंजनाबाई, वडील महादेव पाटील पत्नी रत्नमाला, प्रणाली आणि कल्पना या दोन मुली आणि मिलिंद नावाचा मुलगा असा परिवार आहे.

Protected Content