मोबदल्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गोंडखेल आणि पाळधी येथील शंभरहून अधिक शेतकऱ्यांना भूसंपादनाची शासनाकडून ६१ कोटी ६९ लाख रूपयांची मोबदल्याची रक्कम देण्यास तापी महामंडळ टाळाटाक करीत आहे.  लवकरात लवकर भूसंपादनाची रक्कम द्यावे या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी तापी पाटबंधारे महामंडळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे.

 

गेल्या २० ते २२ वर्षांपासून संपादित जमीनींचा महामंडळात ४ महिन्यांपासून जमा असलेला निधी देण्यास टाळाटाळ करण्याऱ्या व आमच्या जीवनाशी खेळणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी व शेतकऱ्यांना जमा निधी ७१ कोटी ६९ लाख त्वरीत अदा करावे, गेल्या चार महिन्यांपासून बिनव्याजी रक्कम पडून असून त्यापोटी शासनाचे व प्रकल्पग्रस्तांचे झालेल्या नुकसानाची जबाबदारी संबंधितांवर निश्चीत करण्यात यावी, उच्च न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, आणि निधी देण्यास टाळाटाळ करून इतरांना भ्रष्टाचार करून कोट्यावधी रूपये वाटणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी अश्या या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून आमरण उपोषणाला प्रकल्पग्रस्त शेतकरी बसले आहे. मान्य न झाल्यास १४ फेब्रुवारी रोजी शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी जलसमाधी घेणार आहे असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर भगवान पाटील, भिमराव पाटील, लक्ष्मण मोहिते, विकास सोनवणे आणि दिलीप जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content