वरखेड खुर्द येथे तक्रारदाराडून आमरण उपोषण (व्हिडीओ)

बोदवड प्रतिनिधी | वरखेड खुर्द येथील संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याचा आरोप करत तक्रार केल्यानंतरही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने तक्रारदाराडून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

बोदवड तालुक्यातील वरखेड खुर्द येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले असून सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून रोजगार हमीचे काम ठेकेदारी पद्धतीने सूरू असल्याचा आरोप तक्रारदार सचिन आधारसिंग पाटील यांना केला आहे.

वारंवार तक्रार अर्ज करून त्यावर जबाबदार अधिकारी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी कारवाईच्या आश्वासन देऊनही सदरचे आदेश कागदावरचं असल्याने परिणामी बुधवार, दि.१५ डिसेंबरपासून तक्रारदार सचिन पाटील यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

कोणत्याही प्रकारची कारवाई होतं नसल्याने उलट तक्रारदार यांना बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक हे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार सचिन पाटील यांनी केला आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही व लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपण आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा पवित्रा सचिन पाटील यांना घेतला आहे. त्यामुळे पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1975479155966294

Protected Content