जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मालदाभाडी येथे डेअरीचे दुकान फोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात आलेल्या एकाला पकडले असून इतर दोघे पसार झाले आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील दाभाडी येथे होनेस्त डेअरी प्रायव्हेट लिमिटेड हे दुकान आहे. याठिकाणी कंपनीचे तांब्याची वायरी, लोखंडाचे तुकडे व इतर मशिनरी सामान पडलेला आहे. दरम्यान २४ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी रवींद्र उर्फ आरू अरूण वाघोदे रा. मोताळा जि. बुलढाणा ह.मु. सुप्रीम कॉलनी जळगाव, राकेश गोकुळ राठोड आणि उमेश आठे दोन्ही रा. सुप्रीम कॉलनी यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश करत मशीनची पेटीचे कुलूप तोडले. यातून सामानांची चोरून नेण्याचा प्रयत्न करत असताना येथील सेक्युरिटी गार्ड गजानन जयराम काळे यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली असता इतर दोन जण पसार झाले तर संशयित आरोपी अरविंद वाघोदे याला ताब्यात घेतले. याप्रकरणी गजानन काळे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अरविंद वाघोदे, राकेश राठोड, उमेश आठे या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील करीत आहे.