जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अधिकृत खाजगी ऑटोरिक्षांना परवान्यांवर नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता 31 डिसेंबर, 2019 पर्यंत परवाने नोदविता येणार आहेत.
खाजगी ऑटोरिक्षा धारकांनी इरादापत्र मिळविण्यासाठी ऑनलाईन शुल्क रुपये पाचशेचा भरणा करावा, अनुज्ञप्ती (लायसन्स) ऑटोरिक्षा बॅच व चारित्र्य पडताळणी दाखल्यासह कार्यालयात हजर राहून इरादापत्र प्राप्त करावे. बीटीबीआयचे शुल्क रुपये तीनशेचा भरणा करावा. योग्यता प्रमाणपत्राचे सहाशे रुपयेचा भरणा करावा. वाहनांची नोंदणी केल्यानंतर परवाना मिळणेसाठी वाहन 4.0 प्रणालीवर पक्का परवान्याकरीता अतिरिक्त शुल्क रुपये 10 हजार रुपयांचा धनादेश कार्यालयात जमा करावा. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.
ऑटोरिक्षास प्रथम नोंदणी दिनांकापासून एका वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असल्यास रुपये एक हजार, ऑटोरिक्षास प्रथम नोदणी दिनांकापासून एका वर्षापेक्षा अधिक आणि दोन वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असल्यास रुपये दोन हजार शल्क आकारण्यात येईल. तर तीन वर्षापेक्षा अधिक आणि चार वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी रुपये चार हजार शुल्क आकारण्यात येईल. ऑटोरिक्षास प्रथम नोंदणी दिनांकापासून चार वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असल्यास रुपये पाच हजार एवढा शुल्क आकारण्यात येईल. तरी सर्व संबंधित खाजगी ऑटोरिक्षा चालकांनी परवाने नोंदीसाठी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्री. श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रान्वये केले आहे.