शेतकऱ्यांसह आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । केंद्र शासनाने पारीत केलेल्या कृषी विधेयक विरोधात आणि शेतकऱ्यांसह आदिवासी बांधवांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

केंद्र सरकाने पारीत केलेल्या शेतकरी विधेयक मंजूर केले हे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्यासारखे आहे. काळ्या ज्वारीसह कापूस, सोयाबीन व कडधान्य खरेदी केंद्र झालेले नसल्याचे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सर्वांना रेशनकार्ड व रोजगार तथा खावटी राज्यसरकारने उपलब्ध नाहीत. वन कायद्याची न्यायपूर्ण व जन पक्षीय अंमलबजावणी वेळेवर होत नाही. उद्योजक आणि शेतकरी यांना विजबिल सारखे देण्याचा घाट घालणारे वीजबिल विधेयक याला विरोध करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

या आहेत मागण्या
कृषि विषयक अन्यायकारी तीन केंद्रीय कायदे रद्द करावी, शेतकऱ्यांच्या गाळ्याचे फास बनवणारे वीजबिल विधेयक मागे घ्यावे, काळी ज्वारी, कापूस, मका, सोयाबिन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे, अंत्योदय योजनामध्ये नविन लाभार्थी निवड करावी, बंद रेशन कार्ड सुरू करावे, नवीन रेशन कार्डवाटप करावे, खावटीचे दावे चालू करणे आदी मागण्या करण्यात आले आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/482544789318232/

 

 

Protected Content