मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बहुप्रतिक्षित अयोध्या दौर्याला अखेर मुहूर्त लाभला असून ते ६ एप्रिल रोजी आपल्या सर्व सहकार्यांसह रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व सहकार्यांसह अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. मात्र आजवर त्यांना जाता आले नव्हते. आता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सर्व सहकार्यांसह अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्या सोबत शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदारांसह महत्वाचे पदाधिकारी राहतील. हे सर्व जण रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत. याप्रसंगी शिवसेनेतर्फे मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येईल असे मानले जात आहे.
याआधी उध्दव आणि आदित्य ठाकरे यांनी देखील अयोध्येचा दौरा केला असून याला मोठी प्रसिध्दी मिळाली होती. या पाठोपाठ आता एकनाथ शिंदे हे देखील अयोध्येला जाणार आहेत. यासाठी त्यांनी हनुमान जयंतीचा मुहूर्त म्हणजे ६ एप्रिलची तारीख निवडली आहे. आपली हिंदुत्ववादी प्रतिमा अधिक चांगल्या प्रकारे उजळून काढण्यासाठी या दौर्याच्या व्यापक प्रचार आणि प्रसिध्दीचे नियोजन करण्यात येईल असे एकंदरीत दिसून येत आहे.