Home क्राईम जळगावात धाडसी चोरी! घराबाहेर उभी असलेली १० लाखांची ‘महिंद्रा थार’ लंपास

जळगावात धाडसी चोरी! घराबाहेर उभी असलेली १० लाखांची ‘महिंद्रा थार’ लंपास

0
237

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरातील राहणाऱ्या एका तरूणाची १० लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा थार कार अज्ञात चोरट्यांनी घरासमोरून लंपास केली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अभिषेक राजेश शर्मा (वय ३५, व्यवसाय- कॉन्ट्रॅक्टर) हे गणेशवाडीतील प्लॉट नं. १, शुभम टेंट हाऊसजवळ वास्तव्यास आहेत. त्यांनी आपली कार (क्र. MH-19-EP-9495) ३ मे २०२६ रोजी रात्री १० वाजता घराबाहेर सुरक्षितपणे पार्क केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी ४ मे रोजी सकाळी ८ वाजता त्यांना कार जागेवर नसल्याचे दिसून आले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ही हातसफाई केली.

कार चोरीला गेल्याचे लक्षात येताच शर्मा यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरीला गेलेल्या या कारची अंदाजे किंमत १० लाख रुपये आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound