यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील सप्तशृंगी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित डांभुर्णी या संस्थेने यशस्वी २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल शानदार रौप्य महोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते.
संस्थेची स्थापना १० मे २००० रोजी संस्थेचे संस्थापक चेअरमन सोनू गोमा भंगाळे यांनी डांभुर्णी गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने केली होती. सुरुवातीला एका लहानशा खोलीत सुरू झालेली ही संस्था, सभासद आणि हितचिंतकांच्या विश्वासामुळे आज स्वतःच्या मालकीच्या इमारतीत कार्यरत आहे. संस्थेकडे स्वतःचे गोडाऊन व दुकाने असून, सभासदांसाठी स्वर्गरथ, शवपेटी आणि पाण्याची टँकर यांसारख्या आवश्यक सुविधाही उपलब्ध आहेत.
या यशस्वी वाटचालीत सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांनी दाखवलेला विश्वास आणि सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले, असे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. याच विश्वासाच्या बळावर संस्थेने २५ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे आणि आजही हा विश्वास कायम आहे.
रौप्य महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद जिवराम महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य आर.जी. पाटील, डॉ. दिवाकर खंडू चौधरी विद्यालयाचे चेअरमन डॉ. विवेक दिवाकर चौधरी, यावल पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवीताई चौधरी, चंद्रकांत चौधरी, नारायण चौधरी, भंगाळे गोल्डचे संचालक भागवत भंगाळे, प्रगतशील शेतकरी सुरेश चौधरी, भिकारी सोनवणे, माजी महापौर ललित कोल्हे, सिंधुताई कोल्हे, लेखापरीक्षक पी.बी. विसपुते, माजी नगराध्यक्ष सुनील खडके, डॉ. केतकी पाटील, उज्जैनसिंग राजपूत, डांभुर्णीच्या सरपंच कल्पना कोळी, उपसरपंच पुरुजीत चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना आणि संस्थेच्या दिवंगत सभासदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पी.पी. लढे सर आणि कश्मीरा भंगाळे यांनी केले, तर प्रास्ताविक रविंद्र निळेसर यांनी मांडले. संस्थेचे पुढील वाटचालीस असलेले Vision राजेंद्र सोनु भंगाळे यांनी आभार प्रदर्शनात व्यक्त केले. या शानदार कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक संजय नारखेडे आणि गणेश साळुंके यांनी अथक परिश्रम घेतले.