सुसाट कारने सायकलस्वाराला उडविले

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महामार्गाचा रस्ता ओलांडत असतांना सुसाट वेगाने येणाऱ्या कारने सायकलस्वाराला जोरदार धडक दिल्याने ३५ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. संतप्त गावकऱ्यांनी महामार्गावरच रास्ता रोको आंदोलन केले.

 

अजय शामराव शिंदे (वय-३५ )असे मयत तरूणाचे नाव आहे. पारोळा शहरातून गेलेल्या बायपास राष्ट्रीय महामार्गावरून शिवाजी मराठे हे धरणगाव चौफुली रस्त्या ओलांडून घरी जाण्यासाठी सायकलने जात होते. त्यावेळी धुळ्या दिशेने जाणाऱ्या सुसाट वेगाने येणाऱ्या कार क्रमांक (एमएच १८ बीसी ९०७७) ने सायकलस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या धडकेत सायकलस्वार शिवाजी मराठे हे १५ ते २० फुट अंतरावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर पारोळा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह कुटीर रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, अपघात घडल्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी महामार्गावरच रास्ता रोको आंदोलन केल्याचे महायला मिळाले. याप्रकरणी कारचालक हनीफ कतुबुद्दिन शेख (वय-३४) रा. धुळे याच्या विरोधात पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण पारधी करीत आहे.

Protected Content