राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रसन्न पाटील

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील रहीवासी व पक्षाचे तरुण कार्यकर्ते प्रसन्न पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे . निवडीचे पत्र युवक राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश दत्तात्रय पाटील यांनी दिले आहे.

 

जळगाव येथे पक्षाच्या कार्यालयात नुकतीच पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष तथा पक्षाचे जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष पवन पाटील, विजय पाटील, डॉ हेमंत येवले, एम बी तडवी, नाना बोदडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील, वसंत पाटील, दहिगाव ग्राम पंचायत सदस्य यशवंत पाटील, योगेश पाटील, समाधान पाटील, भैय्या पाटील, रोहन महाजन, ललित पाटील, अरुण लोखंडे, अॅड रियाज पटेल, प्रशांत पाटील, मयूर पाटील, गिरीश पाटील, निलेश बेलदार, सलिम तडवी, मुस्तुफा तडवी, सागर सोनवणे, विशाल पाटील, योगेश विलास येवले, किरण सावकारे यांच्यासह आदी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहुन प्रसन्न पाटील यांच्या निवडीचे स्वागत केले.

Protected Content