वैजनाथ ग्रामपंचायत कार्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वैजनाथ ग्रामपंचायत कार्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राजश्री कापुरे व आशिष पाटील यांनी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सायबर बाबत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या अनुषंगाने  वैजनाथ ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र सायबर सेल आणि क्विक हील फाउंडेशन आयोजित सायबर सुरक्षा जनजागृती अभियान अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने राजश्री कापुरे व आशिष पाटील यांनी  बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता वैजनाथ गावातील तरुण मंडळी तसेच शेतकरी वर्गाला सायबर सुरक्षेवर मार्गदर्शन करून ऑनलाईन होणाऱ्या विविध प्रकारच्या सायबर क्राईम बद्दल माहिती दिली त्यापासून कसे सावध व्हावे व यदा कदाचित कुठला सायबर क्राईम त्यांच्यासोबत झाला तर काय प्रक्रीया करावी  याबद्दलची संपूर्ण मार्गदर्शन त्यानी केले.

Protected Content