उद्योजक विकास कार्यक्रमाचा लाभ घ्यावा : अरूण पवार यांचे आवाहन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत उद्या नाशिक येथे एकदिवसीय आदिवासी उद्योजक विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील आदीवासी उद्योजकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी केले आहे.

एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयाव्दारे अपर आयुक्त आदीवासी विकास विभाग नाशिक व ट्राईबल इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स एण्ड इंडस्ट्री ( टीसिसिआय ) यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे महाराष्ट्र पर्यावरण आभियांत्रिकी प्रशिक्षण आणी संशोधन संस्था, नाशिक रोड नाशिक येथे दिनांक १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते५वाजेपर्यंत सदरचे उद्योजक कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाद्वारे आदिवासी उद्योजकांना राज्य शासन व केन्द्र शासनाच्या विविध योजना उद्योग , स्वंयरोजगार करीता असलेल्या योजनांची माहिती व परवाने पत्रांची आवश्यकता, प्रकल्प अहवाल आणि कर्ज प्रकरण बँकींग क्षेत्रातील मान्यवर उद्योजक या एकदिवसीय कार्यक्रमात विषयांवर व्याख्यान व्दारे माहिती आदीवासी उद्योजकांना देण्यात येणार आहे . तरी जळगाव जिल्ह्यातील आदिवासी उद्योजकांनी या एकदिवसीय कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी केले आहे.

Protected Content