विवाहितेला मारहाण : चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील विवाहित महिलेस सासरच्या मंडळींनी मारहाण केल्या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील विदगाव येथील विवाहित महिलेस तिचा पती तसेच सासरच्या मंडळींनी छळ केला, तिला अनेकदा मारहाण केली. या जाचाला कंटाळून तिने तालुका पोलीस स्थानकात फिर्याद दिली.

या प्रकरणी विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार भीमराव मधुकर कोळी, मधुकर जीवराम कोळी, मीराबाई मधुकर कोळी आणि हेमंत मधुकर कोळी ( रा. विदगाव, ता. जळगाव ) यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस स्थानकात भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६, ५१०, अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content