भडगाव प्रतिनिधी । वाळू चोरीच्या ट्रॅक्टर चालका विरुद्ध व वाळू चोरी च्या ट्रॅक्टर जमा करतांना शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरणा नदी पात्रात वडधे गाव जवळ सायंकाळी ७ वाजता सुमारास सार्वजनिक जागी काही ट्रॅक्टर वाळू भरत असल्याचे महसूल विभागाच्या पथकाला माहिती मिळाली. कार्यवाही साठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकाला अवैध वाळु उपसा करताना तीन ट्रॅक्टर आढळुन आली. पुढील कारवाई साठी तिघे ट्रॅक्टर ताब्यात घेत असताना ७ जणानी अडथळा निर्माण केला.
शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या वाळू चोरी च्या ट्रॅक्टर चालका विरुद्ध व वाळू चोरी च्या ट्रॅक्टर जमा करतांना शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या कैलास भावराव पाटील, मिटू सुधाकर पाटील, सोनू संपत पाटील, सागर भालचंद्र पाटील, योगीराज भावराव पाटील, उमेश पाटील, योगेश कैलास पाटील सर्व रा. वाक तालुका भडगाव अशा सात जणा विरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात निवासी नायब तहसीलदार रमेश प्रभाकर देवकर यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३७९, १४१, १४२, १४३ , १८६, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली