किनगाव येथे दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्यासह दारू जप्त

WhatsApp Image 2019 04 05 at 6.38.38 PM

यावल (प्रतिनीधी) तालुक्यातील किनगाव येथील गावठी दारूच्या भट्टीवर फैजपूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या पथकाने छापा टाकत 16 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान ,  संशयित  फरार झाला आहे.

 

तालुक्यातील किनगाव येथील आनंदा महाजन यांच्या  शेतात आरिफ हनीफ पटेल हा  गावठी तिने दारू पाडत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी पो. कॉ. अविनाश चौधरी ,  दिलीप तायडे , सुमित बाविस्कर यांना पटेल याच्या हात भट्टीवर छापा टाकून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानुसार  पथकाने किनगाव येथे जाऊन पाहिले असता दारू गाळण्याचे काम सुरु असल्याचे पथकाला आढळून आले.   पटेल हा पोलीस पथक पाहतात केळीच्या भागातून पळून गेला. पथकाने 1750 रुपयाचे कच्चे-पक्के रसायन, 14 हजार रुपये आठशे पन्नास रुपयाची वीस लिटर दारू असा मुद्येमाल हस्तगत करून जागेवर तो नष्ट केला.  याबाबत येथील पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अरिफ पटेल याचे विरुद्ध मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

One Response

  1. Shubham patil

Add Comment

Protected Content