फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंपरूळ फाट्याजवळ प्लॉट विक्री करण्याच्या कारणावरून एकाला फायटरसह विटांच्या तुकड्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फैजपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज रामदास कापडे (वय-४०) रा. दक्षिण बाहेर पेठ, फैजपूर ता. यावल हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. विटभट्टी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. १७ फेब्रुवारी रोजी ते पिंपरूळ फाट्याजवळ सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास एकटे उभे असतांना प्लॉट विक्रीच्या करणावरून अजय डिगंबर सपकाळे, अनिल सपकाळे (पुर्ण नाव माहिती नाही), तुळशीराम काठोके रा. फैजपूर आणि अनोळखी एक असे चौघेजणांनी मनोज कापडे याला शिवीगाळ करून लोखंडी फायटरने, विटांच्या तुकड्यांनी बेदम मारहाण केली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यात मनोज कापडे याला दुखापत झाली आहे. या घटनेप्रकरणी मनोज कापडे यांनी फैपूर पोलीसात शनीवार १९ फेब्रुवारी रोजी धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्याचा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश चौधरी करीत आहे.