रायसोनी बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रदुषण रोखण्याबाबत जनजागृती अभियान

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली रोडवरील रायसोनी बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रदुषण रोखण्याबाबत इलेक्ट्रॉनिक व्हेइकलचा वापर, रॅली व पथनाट्यातून जनजागृती कार्यक्रम रविवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी कार्यक्रम घेण्यात आले.

 

सध्या जळगाव शहरात धुळीने व हवेच्या प्रदूषणाने अनेक नागरिक त्रस्त झाले आहे. याच बाबीचा अंदाज घेत जळगाव शहरातील रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रदूषण रोखण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू केले आहेत. महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल यांनी काही दिवसांपासून प्रदूषण रोखण्यासाठी ‘युद्ध प्रदूषण के विरुद्ध’ हे अभियान सुरू केलं आहे. याअंतर्गत धुळीविरुद्ध अभियान सुरू करणं, वृक्षांची लागवड, प्लास्टिकचा वापर टाळणे, इलेक्ट्रॉनिक व्हेइकल पॉलिसी लागू करणं व शेतीतील पालापाचोळा जाळण्याऐवजी जैव विघटनाचं तंत्रज्ञान वापरणं याचा समावेश आहे. या जनजागृती अभियानाची सुरुवात करत विध्यार्थ्यानी प्रदूषण मुक्तीचे फलक हातात घेत शिरसोली ते जळगाव या रस्त्यावर रॅली काढली तसेच प्रदूषण मुक्ती संदर्भातील पथनाट्य सादर केले. या विध्यार्थ्यांना सिव्हील अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. सिद्धार्थ पांडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या अभियानाच्या पुढील वाटचालीसाठी रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रीती अग्रवाल, अकॅडमिक डीन  प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content