कुऱ्हा येथे शादीखाना हॉलचे लोकार्पण

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | माजी महसुल कृषी अल्पसंख्यांक मंत्री एकनाथराव खडसे यांच्या निधीतून कुऱ्हा येथे अल्पसंख्यांक समाजासाठी शादीखाना हॉलचे बांधकाम करण्यात आले. आज एकनाथराव खडसे यांच्या हस्ते या शदिखाना हॉलचे लोकार्पण करण्यात आले.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या साहेब पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, प स सभापती सुनिता ताई चौधरी, उपसभापती सुवर्णा ताई साळुंखे, जि प सदस्या वैशाली ताई तायडे, वनिताताई गवळे,सरपंच सुनिता ताई मानकर, उपसरपंच पुंडलिक कपले, माजी जि प सदस्य सुभाष पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा रंजना ताई कांडेलकर, राष्ट्रवादी प्रवक्ता सेल जिल्हा संयोजक विशाल महाराज खोले, माजी सभापती दशरथ कांडेलकर,युवक तालुका अध्यक्ष राजेश ढोले, विलास धायडे, राजुभाऊ माळी, विकास पाटील, माफदा तालुका अध्यक्ष रामभाऊ पाटील,सरचिटणीस रविंद्र दांडगे, माजी सरपंच डॉ बि सी महाजनओमप्रकाश चौधरी, राजु सेठ खंडेलवाल, शिवा पाटील, रणजित गोयनका,गजानन पाटील, पवन पाटील,रमेश खंडेलवाल, पुरुषोत्तम पाटील, डॉ गजानन खिरळकर, प्रदिप पुरी गोसावी, नरसिंग चव्हाण,वसंता पाटील, भागवत भोलणकार, कचरू बढे,गोपाळ पाटील,गणेश विटे,संतोष कांडेलकर, माणिक पाटील,विष्णू झालटे,शकिर जमादार,समसोद्दीन बाबा,मयुर साठे, भैय्या कांडेलकर, सुशील भुतेयांची प्रमुख उपस्थिती होती

 

यावेळी पवन दिनकर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गट प्रमुख पदी तर सोनु इरफान मिस्त्री यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. रोहिणी ताई खडसे खेवलकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, एकनाथराव खडसे यांनी गेले तिस वर्ष राजकारण करताना सर्व जाती समाजाला सोबत घेऊन राजकारण केले अल्पसंख्याक समाजाला नेहमी सत्तेत सामावून घेतले.

अल्पसंख्याक समाजात कुशल कारागीर असतात परंतु त्याला तांत्रिक शिक्षणाची जोड मिळावी शिक्षणात समाज पुढे यावा म्हणून मुक्ताईनगर येथे अल्पसंख्यांक समाजासाठी शासकीय तंत्रनिकेतन मंजूर केले नाथाभाऊ यांच्या प्रयत्नातून उभे राहिलेल्या या शदिखान्याच्या माध्यमातून समाजासाठी एक हक्काची जागा उपलब्ध झाली आहे यातून समाजाला एक व्यासपीठ उपलब्ध झाले असून सामाजिक एकता वाढण्यास मदत होईल.

 

कुऱ्हा परिसराच्या विकासात नाथाभाऊ यांचे मोठे योगदान आहे.  कुऱ्हा परिसराला जोडणारे रस्ते असो की गावातील अंतर्गत रस्ते, सभागृह ,बुद्ध विहार सर्व विकास कामांसाठी नाथाभाऊ यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. विकासाची हि घोडदौड सुरू राहण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या साहेब पाटील म्हणाले गेले तिस वर्ष मी एकनाथराव खडसे यांच्या विरोधात लढलो पण व्यक्तिगत संबंधात कधी कटुता येऊ दिली नाही गेले तिस वर्षात नाथाभाऊ यांनी आपल्या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आज सुद्धा कुठले पद नसताना सुद्धा त्यांच्या शब्दाला शासन दरबारी किंमत आहे त्याद्वारे ते सर्व गोरगरीब जनतेची कामे करत असतात सकाळ पासून त्यांच्या कडे लोकांची गर्दी असते यातून नाथाभाऊ हे लोकनेते असल्याची प्रचिती येते ,नाथाभाऊ यांनी गेले तिस वर्षात खूप विकास कामे केली राहिलेल्या व अपूर्ण असलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नाथाभाऊ, मी, रोहिणी ताई प्रयत्नशील आहोत. नाथाभाऊ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाने पक्षाची ताकद वाढली असून  आगामी काळात होणाऱ्या निवडणुकात ते दिसून येईल जिल्हा परिषदेवर त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

एकनाथराव खडसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले गेले तिस वर्षात आणि अल्पसंख्याक मंत्री असताना अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळवून देण्याचा आणि विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जेथे जेथे अल्पसंख्याक समाज असेल तेथे शादिखाना, कबरस्थानला, रस्त्यांना निधी उपलब्ध करून दिला समाज शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी मुक्ताई नगर येथे पॉलिटेक्निक कॉलेज आणले त्याचे काम पूर्णत्वास येत असून पुढील वर्षापासून ते सुरू होईल तिथे अल्पसंख्यांक समाजासाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था होणार आहे

कुऱ्हा परिसराच्या विकासासाठी नेहमी निधी उपलब्ध करून दिला. नेहमी विकास कामांसाठी प्रयत्नशील राहिलो विकास कामांची स्पर्धा केली.. त्यात कधी आडकाठी आणली नाहीआज आमदारांनी आडकाठी आनल्यामुळे मूलभूत सुविधा 2515 अंतर्गतच्या 5 कोटी रुपये कामाच्या विकास कामांना ब्रेक लागला. विरोधकानी विकास कामांची स्पर्धा करावी मंजुर कामांना आडकाठी आणू नये, कुऱ्हा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी यावे यासाठी कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली तिचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून उर्वरित कामासाठी आपल्या सरकारच्या माध्यमातून भरीव निधी लवकरच उपलब्ध होऊन त्यातून उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण करून लवकरच शेतात पाणी आणून दिलेला शब्द पुर्ण करेल.

कुऱ्हा शहरातील बायपास रस्त्याच्या अडचणी दूर झाल्या असून लवकरच निधी उपलब्ध करून काम मार्गी लागेल, विकास कामे करण्यासाठी मी आणि पक्ष कटिबद्ध आहे त्यासाठी आपण सर्व सुद्धा गेले तिस वर्ष जसे माझ्या सोबत राहिलात तसेच आगामी काळात सुद्धा सोबत राहून येत्या सर्व निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा. तसेच गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखा स्थापन करून पक्ष संघटन मजबुत करण्याचे त्यांनी आवाहन केले.

यावेळी कदिर शहा फकीर,साहेब खा पठाण, सैयद गणी,महम्मद शहा,लुकमान मिजवान,सईद मिस्त्री, इमाम शहा,सैफुला खा ठेकेदार,सैयद भिकन बाबा,रसिद शहा, वसीम शहा,शबीर जमादार,शे रफिक शे इमाम शहा, इब्राहिम,तस्लिम खाअस्फुल्ला खा, चांद शा जालम शा,सैय्यद मन्वर,रहीम शा लुकमान शा,शे रफिक शे यासिन,अनिस शहा जिकरू शहा,कय्युम शहा रसुल शहा,बुढन शहा अब्दुल शहा, जलील मास्टर,सैय्यद मुजाहिदीन,अफसर बाबा, शे सोनू,यांच्यासह अल्पसंख्यांक समाजातील नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी डॉ बि सी महाजन यांनी प्रास्ताविक तर रणजि.त गोयनका यांनी आभार प्रदर्शन केले.

Protected Content