CRIME : दहिगावच्या विवाहितेचा पैशांसाठी छळ; आठ जणांवर यावल पोलीसात गुन्हा

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहीगाव येथील विवाहितेला पैश्यांची मागणी करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात पतीसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील दहीगाव येथील माहेर असलेल्या कांचन भुषण जंजाळकर (वय-२६) यांचा विवाह रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील रहिवाशी भूषण जगन्नाथ जंजाळकर यांच्याशी २०१९ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या एक महिन्यानंतर पती भूषण जंजाळकर याने काहीही कारण नसतांना पैश्यांची मागणी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर पैसे न दिल्याने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यासोबत सासू, सासरे, ननंद, चुलत सासरे, चुलत सासू यांनी देखील पैश्यांसाठी गाजंपाठ केला. हा छळ व त्रास सहन न झाल्याने विवाहिता ह्या माहेरी निघून आल्यात. याबाबत विवाहिता कांचन जंजाळकर यांनी यावल शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती भूषण जगन्नाथ जंजाळकर, सासू लिलाबाई जगन्नाथ जंजाळकर, सासरे जगन्नाथ डिगंबर जंजाळकर, ननंद संगिता निलेश जाधव, ननंद सुवर्णा प्रमोद रूल्हे, चुलत सासरे सदाशिव डिगंबर जंजाळकर, चुलतसासू मंगलाबाई सदाशिव जंजाळकर, सोपान सदाशिव जंजाळकर सर्व रा. तांदलवाडी ता. रावेर यांच्याविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय देवरे करीत आहे.

Protected Content