जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील के.सी.पार्क येथील माहेर असलेल्या विवाहितेला शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवार २४ सप्टेंबर रोजी दुपारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील के.सी.पार्क येथील माहेर असलेल्या गौरी सुर्यकांत देशमुख यांचा विवाह परभणी येथील सुर्यकांत अनंतराव देशमुख यांच्याशी २०१८ मध्ये रितीरिवाजानुसार झाला होता. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती सुर्यकांत देशमुख याने लहान सहान गोष्टींवरून टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर सासू, नणंद यांनी देखील काहीही कारण नसतांना गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता जळगाव शहरातील के.सी.पार्क येथे माहेरी निघून आल्या. शनिवारी २४ सप्टेंबर रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात विवाहितेने धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती सुर्यकांत अनंतराव देशमुख, प्रभावती अनंतराव देशमुख रा. कोरेगाव, जळगाव आणि नणंद चंद्रकला जीवनराव देशमुख रा. गजानन नगर, परभणी यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ललित भदाणे करीत आहे.