कॅटरींगचे गोडावून फोडून सामांनाची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील धनाजी काळे नगरातील कॅटरींगचे गोडावून फोडून ६३ हजार ५०० रूपये किंमतीचे सामानांची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी २४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुरूषोत्तम मांगो चिमणकर (वय-३२) रा. विद्या हाऊसिंग सोसायटी, पिंप्राळा जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचा कॅटरींगचा व्यवसाय आहे. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे त्यांनी गोडावून बंद करून घरी निघून गेले. दरम्यान, मध्यरात्री राजकुमार मकरसुधार विश्वकर्मा (वय-२४) रा. धनाजी काळे नगर या तरूणाने गोडावूनचे दोन्ही कुलूप तोडून आत प्रवेश करून अल्यूमिनीअमचे मोठे पातेले, बादल्या, तासा, लांखेडी पत्रा, इतर सामान असे एकुण ६३ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमालाची चोरी केल्याचे उघडकीला आले. यासंदर्भात पुरूषोत्तम चिमणकर यांनी शनिवारी २४ सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून राजकुमार विश्वकर्मा याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉस्टेबल भास्कर ठाकरे करीत आहे.

Protected Content