जुन्या वादातून दाम्पत्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून अश्लिल शिवीगाळ करत महिलेसह तिच्या पतीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी २६ मे रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगा तालुक्यातील कानळदा येथे वैशाली ईश्वर सपकाळे वय ४० या महिला आपले पती ईश्वर सपकाळे यांच्यासोबत वास्तव्याला आहे. सोमवारी २६ मे रोजी सकाळी ८ वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून शेजारी राहणारा संदीप एकनाथ कोळी, छाया संदीप कोळी, गोकुळ एकनाथ कोळी आणि सुषमा भैय्या कोळी सर्व रा. कानळदा यांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी वैशाली सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे संदीप एकनाथ कोळी, छाया संदीप कोळी, गोकुळ एकनाथ कोळी आणि सुषमा भैय्या कोळी सर्व रा. कानळदा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे हे करीत आहे.