लोकसभेच्या ५४२ जागेसाठी आज सकाळी ८ वाजेपासून मतदान मोजणीला होणार सुरूवात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याच्या पंडित नेहरूंच्या विक्रमाची मोदी बरोबरी करणार का? भाजपचा 370 आणि एनडीएचा 400 पार करण्याचा दावा पूर्ण होईल का? 10 वर्षांनंतर काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळेल का? या तीन सर्वात मोठ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आजचा दिवस आहे.

लोकसभेच्या 543 जागांसाठी आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. त्याची सुरुवात पोस्टल बॅलेटने होईल, त्यानंतर ईव्हीएम मतांची मोजणी केली जाईल. येत्या दोन तासांत नव्या सरकारची भूमिका जवळपास स्पष्ट होईल. 2 वाजेपर्यंत सेलिब्रेशन आणि निराशेची चित्रेही पाहायला मिळतील. 1 जून रोजी जाहीर झालेल्या 12 प्रमुख एक्झिट पोलनुसार, भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार बनवणार असल्याचे दिसत आहे.

16 मार्च रोजी निवडणूक आयोगाने 7 टप्प्यांत लोकसभेच्या 543 जागांसाठी मतदानाच्या तारखा जाहीर केल्या होत्या. 44 दिवसांची ही निवडणूक 1952 नंतरची सर्वात मोठी निवडणूक होती. 1952 मध्ये ती 4 महिने चालली. पूर्वी ती सहसा 30 ते 40 दिवसांत संपत असे.

Protected Content