मोठी बातमी : शिंदे गटात खदखद; शंभुराज देसाईंच्या वक्तव्याने खळबळ !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारमध्ये अजित पवार आणि सहकार्‍यांना सामावून घेतल्याने शिंदे गटात मोठी अस्वस्थता पसरली असून अनेकांनी पुन्हा मातोश्रीकडे जावे असा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत कलहास उधाण आले असून पवारांच्या लढाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच शिंदे गटातही उद्रेक उफाळून आल्याची माहिती समोर आली आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूर येथे राज्यपालांचे स्वागत करून तातडीने मुंबईला दाखल झाल्याने हा मुद्दा अधोरेखीत झाला आहे.या गटाचे अर्थात शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाण्याबद्दल सकारात्मकता दर्शविणारे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

 

शिंदे गटांनी ज्यांना प्रखर विरोध केला त्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्ष सत्तेत भागीदार झाल्याने शिंदे गट नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत आता शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सूतोवाच केले आहे. काल सायंकाळी पत्रकार परिषदे आता परत उद्धव ठाकरे यांनी हाक दिली, आम्ही एकत्र येतो करून तर तुम्ही मान्य करणार का? असा प्रश्न त्यांन विचारण्यात आला.त्यावर बोलताना हा जर तर हा पुढचा विषय आहे. ज्यावेळी हाक येईल तेव्हा साद दिली जाईल असे म्हणत त्यांच्याकडून तशी साद आली तर सकारात्मक प्रतिसाद आम्ही देऊ. असे मोठे विधान केले आहे. देसाई यांनी आजवर वर्षभरात अशा स्वरूपाचे कोणतेही विधान केले नसल्याने याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यातून त्यांनी पक्षातील अंतर्गत कलहाला जगासमोर मांडल्याचे मानले जात आहे. अर्थात, हा सूचक इशारा देखील असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Protected Content