Home Uncategorized जनआधारच्या नगरसेवकांना न्यायालयाचा दिलासा

जनआधारच्या नगरसेवकांना न्यायालयाचा दिलासा

0
45

भुसावळ प्रतिनिधी । येथील जनआधार आघाडीच्या चार नगरसेवकांना अपात्र करण्याच्या मुख्याधिकार्‍यांच्या निर्णयाला न्यायालयाने रद्दबादल केल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळातील जनआधार आघाडीचे गटनेता उल्हास पगारे यांच्यासह रवींद्र सपकाळे, पुष्पा जगन सोनवणे आणि संतोष चौधरी (दाढी) यांना मुख्याधिकार्‍यांनी अपात्र ठरवून पाच वर्षांसाठी बंदी घातली होती. मात्र, या प्रकरणी संबंधीतांनी औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती. येथे या चौघांना दिलासा मिळाला असल्याने त्यांचे पद शाबूत राहणार आहे. लोकसभा निवडणुकीआधी संतोष चौधरी यांना यातून नवीन उभारी मिळणार असल्याचे मानले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound