मनपाच्या चार प्रभाग समिती सभापतींची बिनविरोध निवड ( व्हिडीओ )

MNP

जळगाव (प्रतिनिधी)। महानगरपालिकेच्या चार प्रभाग समिती सभापतींची आज सकाळी बिनविरोध निवड झाली आहे. आज झालेल्या विशेष महासभेत प्रभाग १ साठी डॉ.चंद्रशेखर पाटील, प्रभाग समिती २ मध्ये रंजना सोनार, प्रभाग ३ मध्ये सुरेखा सोनवणे तर प्रभाग चार मधून विजय पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. निवड झालेल्या चार प्रभाग समितीच्या नवनियुक्त सभापतींची महापौर सिमा भोळे यांच्याहस्ते बुके देवून शुभेच्छा दिल्यात.

यांची होती उपस्थिती
महापौर सिमा भोळे, भजपाचे मनपा गटनेते तथा नगरसेवक भगत बलाणी, उपमहापौर आश्विन सोनवणे, स्थायी समितीचे सभापती जितेंद्र ठाकूर, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक विष्णू भंगाळे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, उपसचिव सुनिल गोरानी यांच्यासह सर्व प्रभागातील नगरसेवक यांची उपस्थिती होती.

मंगळवारी चार प्रभागांसाठी आज चारच अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट झाले होते. आज फक्त याबाबत औपचारिक घोषणा करण्याची केली गेली. दरम्यान, शिवसेनेने एकाही प्रभागात उमेदवारी अर्ज भरला नव्हता. २१ रोजी सभापतींच्या निवडीसाठी विशेष महासभा घेण्यात येणार होती. मात्र, जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचा दौर्‍यामुळे ही विशेष महासभा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे ही महासभा आज (बुधवार) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. काल (मंगळवार) दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग समिती सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्याची मूदत होती. त्यानुसार प्रत्येक प्रभाग एक असे एकूण चार नगरसेवकांनी आपले अर्ज दाखल झाले होते. एमआयएमला सोबत घेवूनही शिवसेनेला कोणत्याही प्रभागात संधी नसल्याचे लक्षात आल्यामुळेच सेनेने अर्ज देखील भरला नव्हता.

गेल्या सहा महिन्यांपासून कामे पडून
महानगर पालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपाची सत्ता येवून सहा ते सात महिने होत आहेत. परंतु अद्यापही प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आलेली नसल्यामुळे अनेक विषय प्रलंबित आहेत. तसेच 5 लाखापर्यंतच्या कामांच्या मंजुरीचे विषय हेदेखील प्रभाग समितीत मंजूर न होता मनपात त्यांचे प्रस्ताव पाठवावे लागत आहेत.

पहा– प्रभाग समिती निवड प्रक्रियेचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content