कोरपावली विकासो संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील कोरपावली येथील शेतकरी बांधवांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यात अग्रेगण्य असलेली कोरपावली  विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी २४  सप्टेंबर २०२३ रोजी चेअरमन  राकेश वसंत फेगडे यांच्या उपस्थित घेण्यात आली.

 

या सभेत मयत झालेल्या संस्थेच्या सभासद आणि सीमेवर देशासाठी बलिदान दिलेल्या विरमरण पावलेल्या सैनिकांना सर्वानुमते श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेचे अध्यक्ष  राकेश फेगडे  यांच्या परवानगीने पुढील सभेस सचिव मुकुंद तायडे यांनी सभेच्या विषय पत्रिकानुसार  सर्व विषयांवर सर्व सन्मानिय संचालक मंडळाची संस्थेला २o२१ ते २०२३ या आर्थिक वर्षामध्ये १५ लाख ७३ हजार नफा झालेला असल्याचे सभेत सांगण्यात आले.

संपूर्ण कामकाजाचा आढावा वाचन करून माहिती देण्यात आली, संस्थेच्या वतीने पवणे ४ कोटी कर्ज पुरवठा करण्यात आले असून, सुमारे २० टक्के कर्ज वसुली होऊन २६ लाख रुपये कर्ज येणे थकीत असून तरी सभासदांनी कर्ज वसुलीस सहकार्य करून संस्थेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.

 

सभेस आयत्या वेळेस जलील पटेल व संदीप नेहेते यांच्यासह काही सभासदांनी वार्षिक खर्चाचा अंदाजपत्रक अहवाल प्रसिद्ध करून सदस्यांना देण्यात यावा या विषयाला चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी मंजूरी दिली. या सभेत केंद्र सरकार पुरस्कृत नविन पोटनियम लगुकरून संस्तेच्य कर्मचाऱ्यांना सेवा नियम लागू करण्यात बाबतचा प्रस्तावास मंजूरी देण्यात आली.

 

गावातील सभासदांनी सहभाग घेऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा संपन्न झाली. त्यावेळेस संस्थेचे सचिव  मुकुंद तायडे यांनी विषय वाचन केले तर संस्थेचे संचालक यांनी आभार व्यक्त केले. या सभेस यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव मुकुंद तायडे व कर्मचारी  नेमीचंद महाजन, रमजान तडवी यांनी सहकार्य केले.

Protected Content