खिरोदा येथील अध्यापक विद्यालयात समुपदेशन शिबीर

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या खिरोदा येथील अध्यापक विद्यालयात प्रथम व द्वितीय छात्रध्यापकांना डॉ. आरती चौधरी यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट , भावनात्मक मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन केले.

 

राग आल्यास उलटे अंक म्हणावे तसेच खोल श्वास घेत जावे, स्ट्रेसला मॅनेज करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे योग, ध्यान, धारणा करावी.  मोबाइलच्या व्यसनांपासून लांब रहावे, सर्वात घातक व्यसन म्हणजे मोबाइल असे त्यांनी या वेळी सांगितले. समाजातील अनेक रंजल्या गांजलेल्या व्यक्तींना मार्गदर्शन आरती चौधरी मार्गदर्शन करतात. आरती ह्या मॅनेजिंग डायरेक्टर सक्षम काऊन्सिलिंग सेटंर भुसावळच्या आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य मा. डॉ. अरुणाताई चौधरी होत्या. प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रतिभा बोरोले यांनी केले. सुत्र संचालन हेमांगी चौधरी यांनी केले. आभार अरुणा पदमे यांनी केले.

Protected Content