जिल्हाधिकाऱ्यांचा दणका : जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगार ‘एमपीडीए’अंतर्गत स्थानबध्द

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमपीडीए कायद्यांतर्गत रामानंदनगर पोलीस ठाणे आणि पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द करण्याचे आदेश काढले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी  शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. विश्वास अरूण गारूंगे (वय-४२) रा. समता नगर, जळगाव आणि समाधान लोटन चौधरी (वय-३६) रा. राजीव गांधी नगर, पारोळा या अशी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विश्वास अरूण गारूंगे हा गुन्हेगार परिसरात अवैधरित्या गावठी दारून बनविणे व त्याची विक्री करणे व शासनाच्या आदेशाने उल्लंघन करणे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे एकुण १८ गुन्हे रामानंद नगर पोलीसात दाखल आहे. शिवाय त्याच्यावर या आधि चार वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली. परंतू त्याच्या कोणतीही सुधारणा झाली नसल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी अहवाल तयार करून जिल्हा मुख्यालयात पाठविला. तर पारोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा समाधान लोटन चौधरी यांच्या विरोधात वेगवेगळ्या स्वरूपाचे १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात अवैध दारू विक्री, गावठी दारू बनविणे, फसवणूक, चोरी, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणे, स्फोटक पदार्थ सोबत बाळगणे, हाणामारी असे गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर योग्य आळा घालण्यासाठी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी देखील याचा स्थानबध्द करण्याचा अहवार पोलीस मुख्यालयात पाठविला. जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी दोन्ही प्रस्तावाचे अवलोकन करून जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना केला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आलेल्या प्रस्तावानुसार अरूण गारूंगे याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात तर दुसरा गुन्हेगार समाधान चौधरी याला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश केले आहे.

Protected Content