राहत्या घरात भावाने केलं अस काही.. बहिणीने फोडला हंबरडा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मयुर कॉलनीत राहणाऱ्या वीस वर्षीय तरूणाने घरात कुणीही नसतांना राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. क्लास मधून आलेल्या बहिणीने घरी आल्यावर भावाने गळफास घेतल्याचे लक्षात येताच हंबरडा फोडला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुर्गेश भरत बारी (२०) रा. मयूर कॉलनी, पिंप्राळा परिसर, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दर्गेश भरत बारी हा तरूण पिंप्राळा परिसरातील मयुर कॉलनीत वास्तव्याला होता. त्याचे वडील भरत बारी हे होमगार्ड असून इतर वेळी रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी दुर्गेशचे वडील कामावर निघून गेले. त्याची आई कविता ह्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या तर बहिण नंदीनी ही क्लासला गेली होती. त्यावेळी दुर्गेस हा घरी एकटाच होता. दुपारी त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.दुपारी एक वाजता बहिण नंदिनी ही क्लासमधून घरी आली तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा ठोकून आवाज दिला. परंतू आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेजारी राहणाऱ्या नागरीकांच्या मदतीने दरवाजा उघडला तर दुर्गेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. भावाला पाहताच बहिण नंदिनी हंबरडा फोडला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामांनद नगर पेालीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही.

Protected Content