अघोषित भारनियमन तातडीने थांबवा – आ. चिमणराव पाटील

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  एरंडोल विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण राज्यात सध्या अघोषित भारनियमन लादण्यात आलेले आहे. या अघोषित भारनियमनामुळे शहर, ग्रामीण भागातील नागरिकांसह शेतकरी बांधवांची मोठी गैरसोय होत आहे. हे भारनियमन शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीस कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे अघोषीत भारनियमन तातडीने थांबवावी अशी मागणी आ. चिमणराव पाटील यांनी केली आहे.

 

अघोषित भारनियमनामुळे शहर, ग्रामीण भागातील नागरिकांसह शेतकरी बांधवांची मोठी गैरसोय होत आहे. हे भारनियमन शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीस कारणीभूत ठरणार आहे.  अस्मानी संकटाने पाण्या अभावी आधीच शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे आणि त्यात भरीसभर म्हणून वेळी अवेळी होणारे भारनियमन यामुळे पिकाला पाणी नाही. यावेळी पिकांना मुबलक पाणी मिळाले तरच ही पिके पुढे टिकून राहू शकतात. अशात पिकांना पाणी देणेसाठी सद्यस्थितीत विजेची खूप मोठी आवश्यकता आहे. सदर लोडशेडिंगमुळे  शेतकरी बांधवांचा वीजपुरवठा अनियमितपणे बंद करण्यात येतो. सदर वीजपुरवठा बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. वीजपुरवठा हा अनियमितपणे बंद पडत असल्यामुळे शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. अशावेळी वीज उपलब्ध करणे अत्यंत आवश्यक आहे.

 

सदरील वीजपुरवठेचा होत असलेला तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्रीय स्तरावरील ग्रिडमधून रास्त दराने विज खरेदी करण्याचे नियोजन करावे किंवा महावितरण कंपनीतर्फे  एकतर पुरेसा कोळसा उपलब्ध करून वीजसंच सुरु करावे अथवा हे शक्य नसल्यास अघोषित भारनियमन ऐवजी भारनियमनाची वेळ ही निश्चित करून देण्यात यावी, जेणेकरून शेतकरी, नागरिक, व्यावसायिक, व्यापारी यांना त्यांचे होत असलेले नुकसान रोखण्यासाठी नियोजन करता येईल. तसेच याबाबत योग्य ते नियोजन करून शेतकऱ्यांसह नागरिकांचे होणारे, हाल, आर्थिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.

Protected Content