नितेश राणेंवर गुन्हा दाखल करा; पारोळ्यात शिवसेनेचे निवेदन

पारोळा प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल बाबत शिवसैनिकांनी पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे भाजप नेते निलेश राणे यांच्या विरोधात जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत निवेदनही देण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, आर.बी.पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, अशोक मराठे, शहरप्रमुख महाजन, सावंत शिंपी, उपशहर राजू कासार, माजी नगरसेवक राजू जावरे, आरपीआय तालुकाअध्यक्ष राकेश जावरे, लोक जनशक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, चोरवडचे उपसरपंच अनिल पाटील, माजी सरपंच जगदीश पाटील, सतीश पाटील, बबलू माने, विलास वाघ, तसेच शिवसेना, युवासेना, महीला आघाडी पदाधिकारी शेकडो संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content