पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ग्रेस अकॅडमी स्कूल, खडकी हिरापूर रोड ता. चाळीसगाव जिल्हा जळगाव शाळेतील शिक्षकांना राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात शाळेचे संस्था चालक विश्वास बारिस व चाळीसगाव देवा गृपचे सदस्य अण्णा गवळी यांचे अनमोल सहकार्य लाभले. या कार्यक्रमात राष्टीय बंजारा परिषदचे जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ. अरविंद पवार, जिल्हा संघटक नितीन नाईक, जिल्हा मीडिया प्रमूख अनिल तवर, युवा आघाडी अध्यक्ष विजय राठोड, युवा संघटक अॅड. उमेश राठोड, पारोळा तालुका अध्यक्ष विश्वास पवार, भडगाव तालुका अध्यक्ष श्याम पवार, जामनेर तालुका अध्यक्ष पपू तवर यांचे अनमोल सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे आयोजक तालुका चाळीसगाव अध्यक्ष विनोद चव्हाण, उपाध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी केले होते.