कोरोना : आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्याची साडेसाती लयाच्या टप्प्यावर !; आजची नवी रुग्णसंख्या ३६२

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने आलेल्या कोरोना अहवालात जिल्हाभरातून आज दिवसभरात ३६२ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आजच ८५७ रूग्ण कोरोनामुक्त झाली असून ९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्हाभरातील आकडेवारी

जळगाव शहर-३३, जळगाव ग्रामीण- २८, भुसावळ-४२, अमळनेर-३२, चोपडा-३१, पाचोरा-२, भडगाव-२, धरणगाव-१४, यावल-२५, एरंडोल-२, जामनेर-२७, रावेर-८, पारोळा-७, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-१९,  बोदवड-१७ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण ३६२ बाधित रूग्ण आढळले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३८ हजार ३१३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख २८ हजार २४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित ७ हजार ८०२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरातून ९ बाणित रूग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

Protected Content