कोरोना : जिल्ह्यात आज २ संक्रमित रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात दोन बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

जळगाव जिल्ह्यात आता कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात आली आहे. जिल्ह्यात आज दोन बाधित रूग्ण आढळून आले आहे. जळगाव शहरातून एक आणि भुसावळ तालुक्यातून एक असे दोन बाधित रूग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ९५ रूग्ण आढळले तर १ लाख ४० हजार ९५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २५ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

Protected Content