कोरोना : जिल्ह्यात आज तीन संक्रमित रूग्ण आढळले; दोन रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात अमळनेर, चोपडा आणि जामनेर तालुक्यात प्रत्येक १ असे एकुण तीन बाधित रूग्ण आढळून आले आहे. कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ६८५ रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ४० हजार ८३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २७ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २ लाख ५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रान्वये कळविले आहे. 

 

Protected Content