रावेरच्या पुरवठा विभागातील गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण

 

रावेर : प्रतिनिधी ।  रावेर पुरवठा विभागातील कथित भ्रष्ट्राचार प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून लवकरच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे अहवाल देण्यात येणार असल्याचे प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी सांगितले

 

या अहवालात कोणावर ताशेरे ओढण्यात आले याबाबत माहिती  देणे  प्रांतधिका-यांनी गोपनीयतेचा हवाला देत टाळले  आहे. त्यामुळे यात कोणाला दोषी ठरवण्यात आले आहे याची उत्सुकता वाढली आहे. हे प्रकरण रावेर तालुक्यात सर्वाधीक चर्चेतील प्रकरणापैकी एक आहे.

 

रावेर पुरवठा विभागातील कथित भ्रष्ट्राचार प्रकरणात प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी तालुक्यातील रेशन दुकानदारांचे  लेखी खुलासे घेतले असून रावेरच्या  तहसीलदार उषाराणी देवगुणे यांचादेखिल लेखी खुलासा घेण्यात आला आहे. हे प्रकरण तालुक्यात सर्वाधिक चर्चेतील असून नुकतीच प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण  केली  आहे. या कथित  पुरवठा विभागाच्या भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणाचा माध्यमांनी भांडाफोड  केला होता.

 

 

Protected Content