किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे नागरिकांची कोरोना चाचणी

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील किनगाव परिसराची कोरोनामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे आज तब्बल ७६ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली.

त्या वेळेस उद्धाटन चोपडा मतदार संघाच्या आमदार लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी लोकांनी कोरोना विषाणु या संसर्गाची भीती न बाळगता लोकांनी चाचणी जास्तीत जास्त प्रमाणात करून कोरोना पुर्णपणे नष्ट करू या. कोरोना मुक्त किनगाव करू या. असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.  किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन यांनी कोरोनामुक्त किंनगाव करण्यासाठी सतत आरोग्यसेविका, आरोग्यसेवक ,आशा सेविका अंगणवाडी सेविका, आणि शिक्षिका यांच्या मदतीने प्रत्येक घरातून पेशंट तपासणी करून त्यांना काही लक्षण असल्यास त्यांची चाचणीसाठी त्यांना आरोग्य केंद्रात आणले जात आहे आणि लगेच ३० मिनिटात त्यांचा रिपोर्ट पण दिला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आशा वर्कर यांची झूम मिटिंगद्वारे कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तसंच रोज त्यांच्या संपर्कात राहून कामाचा अहवाल घेतला जात असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले. 

तसेच आज यावल तालुक्यातील किनगाव ही हे पहिले केंद्र आहे. जिथे मोठ्या प्रमाणावर कोरोना तपासणी करून ७६ स्वब घेतले आणि हे सर्व स्वब निगेटिव्ह आले आहेत. गेल्या आठवडाभरात किनागाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सुमारे ३० हजार लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, असे डॉ. मनिषा महाजन यांनी आनंद व्यक्त करत सांगितले. हे सर्व काम  कोरोना योद्धा म्हणून काम करणारे प्रत्येक आरोग्य कर्मचारी मूळे होत आहे आणि त्याच्या कडून डॉ महाजन या काम करून घेत आहे असे आमदार लताताई सोनवणे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले . आणि यापुढे ही त्या किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास कोरोना चाचणी किट उपलब्ध करून देणार असल्याचे  त्यांनी आश्वासन दिले.

यावेळी मा.माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, कृषि उत्त्पन्न बाजार समिती अध्यक्ष मा.मुन्नाभाऊ,गटविकास अधिकारी निलेश पाटील, तहसीलदार जितेन्द्र कुवर, तालुका आरोग्य अधिकारी हेमंत बऱ्हाटे ,प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी किनगाव डॉ. मनिषा महाजन आणि साकळी प्राथमिक आरोग्य केन्द्राचे डॉ. सागर वारके, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

Protected Content