कोरोनाने आपल्याला दवा आणि दुवाचे महत्व शिकविले : ना. गुलाबराव पाटील

पाळधी, धरणगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीने आपल्याला दवा आणि दुवाचे महत्व पटवून दिले आहे. यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांनी सेवा करून लोकांची दुवा घेतली असून आगामी काळात सुध्दा त्यांनी याच प्रकारे काम करत रहावे अशी अपेक्षा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. पाळधी-चांदसर गटात प्राथमिक आरोग्य केंद्रासह अन्य विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण करतांना ना. गुलाबराव पाटील बोलत होते. 

दरम्यान, गटातील गावांमध्ये पालकमंत्र्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात येऊन त्यांची गावातून मिरवणूक देखील काढण्यात आली. तर याप्रसंगी गिरणा नदीवर चांदसर ते पिलखेडा दरम्यानच्या मोठ्या पुलासह रस्ता डांबरीकरण, पेव्हर ब्लॉक, सामाजिक सभागृह, शेतरस्ते, अंगणवाणी, मोर्‍या आदी कामांचे भूमिपुजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे होते.

धरणगाव तालुक्यातील पाळधी-चांदसर गटातील चांदसर, कवठळ व चोरगाव येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी कोरोना काळातील आरोग्य कर्मचार्‍यांच्या सेवेचा गौरव केला. तर या गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही सुध्दा पालकमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, ना. गुलाबराव पाटील यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जनतेच्या कायम संपर्कात राहून त्यांचे सुख-दु:ख जाणून घेत, त्यांच्या समस्यांचे निराकरण करत विकासाला प्राधान्य देण्याची गरज आहे. आपण जनसेवेचे काम करत रहावे. निवडणुका आल्या की विरोधक हे पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे उगवतात. मात्र याकडे लक्ष न देता जनतेची सेवा करत रहावी असा मूलमंत्र पालकमंत्र्यांनी दिला. तर याच माध्यमातून त्यांनी विरोधकांना टोला देखील लगावला.

चांदसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम २ कोटी ५० लक्ष , कवठळ व चोरगाव येथे पेव्हींग ब्लॉक चे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

चांदसर येथे मंजूर व प्रगतीतील कामे 

लाडली ते चांदसर रस्ता डांबरीकरण करणे 2 कोटी 81 लक्ष , चांदसर- पिल्खेडा रस्त्यावर गिरणा नदीवरील मोठ्या पुलाचे काम 3 कोटी 64 लक्ष , मूलभूत सुविधे  (2515) योजने अंतर्गत पेव्हींग ब्लॉक बसवणे 8 लक्ष, सामाजिक सभागृह बांधकाम 10 लक्ष,  शेतकऱ्यांचा महत्त्वाचा धनगर वाट शेत रस्त्यासाठी डांबरी करण्यासाठी 50 लक्ष,  अंगणवाडी बांधकाम 8 लक्ष , चांदसर- पिल्खेडा रस्त्यावर मोऱ्या बांधकाम साठी 6 लक्ष अशा इतर काम विविध विकास कामे मंजूर करण्यात आली असून प्रगतीत आहे.

चांदसर , चोरगाव व कवठळ येथे पाळकमंत्र्यांचे उत्स्फूर्त स्वागत !

चांदसर कवठळ चोरगाव व परिसरात सुमारे 14 – 15 कोटींचे रस्ते, पूल व विविध जनहिताचे काम मंजूर केल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ढोल ताशे, फटाक्यांच्या आतषबाजी करून गावांतून मिरवणूक काढण्यात आली. चौका – चौकात महिलांनी औक्षण केले. मिरवणुकीत हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.विविध विकास कामांचे लोकार्पण प्रसंगी यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी महापौर विष्णुभाऊ भंगाळे, पं स सभापती प्रेमराज पाटील,जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,सरपंच सचिन पवार, संजय पाटील, मुकुंदराव ननावरे,रवि चव्हाण सर, भागवत मोरे, प्रगतशील शेतकरी जगन पाटील, गयभू पाटील, देवराम चौधरी, भिका नन्नवरे, चोरगाव येथे सरपंच उषाताई सोनवणे, प्रविण पवार,राजेंद्र पवार, भिमराव पवार,कवठलं येथिल व  परिसरातील सरपंच नाना सोनवणे, दादाभाऊ पाटील, पिंटू पाटील,वासुदेव पाटील, अमोल कासट, शरद कोळी, वैद्यकीय अधिकारी  डॉ. नरेश पवार, व कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात सरपंच तथा सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले की, चांदसर गावाची वाटचाल ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गावाकडे सुरू आहे. गावातील उर्वरित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री यांच्याकडे साकडे घातले. सूत्रसंचालन व आभार सचिन पवार यांनी मानले.

 

Protected Content