Home आरोग्य कोरोना : शहरातील बाजारपेठ व मार्केट परिसराची एसपींकडून पाहणी (व्हिडीओ)

कोरोना : शहरातील बाजारपेठ व मार्केट परिसराची एसपींकडून पाहणी (व्हिडीओ)


जळगाव प्रतिनिधी । कोरोना रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले आहे. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी आज शहरातील मुख्य चौकात आणि मार्केट परिसरात पाहणी करून अनावश्यक सुरू असलेल्या दुकानांना बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आले. 

मंगळवारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहे. पारित केलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, दुकानदार अजूनही संभ्रमावस्थेत आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यातच जळगाव शहरात जणू कोरोनाचा उद्रेकच झाला आहे. नागरिक आणि ग्रामस्थांना अजूनही कोरोना विषयी गांभीर्य नसल्याचे दिसून आल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले. यापार्श्वभूमीवर आज ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी शहरातील सुभाष चौक, गांधी मार्केट, फुले मार्केट, दाणबाजार, गोलाणी मार्केट परिसरात रस्त्यावर उतरून पाहणी केली. यात काही अनावश्यक सुरू असलेल्या दुकानांना प्राथमिक स्वरूपात बंद करण्याचे ताकिद दिली. उद्यापासून याची अंमलबजावणी कडकपणे करण्याचा येईल असा इशारा देखील दिला. 

याप्रसंगी उपायुक्त संतोष वाहूळे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे, शनीपेठ पोलीस ठाण्याचे पो.नि. विठ्ठल ससे, पोहेकॉ विजय निकुंभ यांच्यासह महापालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/2490291017946197

 


Protected Content

Play sound