आजही हाहाकार : २४ तासांमध्ये २.६१ लाख कोरोना बाधीत

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशभरात कोरोनाचा कहर जारी असून गत २४ तासांमध्ये तब्बल २ लाख ६१ हजार ५०० पेशंट आढळून आले असून दीड हजारांपेक्षा जास्त बळी गेले आहेत. आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

रविवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 2,61,500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक कोटी 47 लाखांवर पोहोचली आहे.

कोरोनामुळे देशात तब्बल 1,77,150 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,61,500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,47,88,109 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 77 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 18,01,316 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,28,09,643 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

नव्या म्युटेशनमुळे करोना संक्रमणाचा प्रसार वाऱ्यासारखा होत आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत असतानाच देशात नव्या विश्वविक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येबरोबरच देशातील मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली आहे. अंत्यसंस्कारासाठी अनेक ठिकाणी मृतदेहांच्या रांगा लागत असून, महामारीचं संकट आणखी गडद झालं आहे. पहिल्या लाटेपेक्षा करोनाची दुसरी लाट घातक ठरताना दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत चालली आहे.

Protected Content