जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज नव्याने १५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील गेल्या महिन्यांपासून कोरोनाचे रूग्ण संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नव्याने पंधरा कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ८१९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४९ हजार १५४ रूग्ण बरे होवून घरी परतले तर २ हजार ५९२ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ७३ कोरोना बाधित विविध रूग्णालयात उपचार घेत आहे.