खान्देशकन्या शीतल महाजन यांचा नवीन विक्रम : नऊवारीतून पाच हजार फुटांवरून पॅराजंपींग

पुणे प्रतिनिधी | खान्देशकन्या शीतल महाजन यांनी पॅरामोटरमधून पाच हजार फुट उंचीवरून नऊवारीत पॅराजंप करून नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे.

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने पॅरामोटार मधून नऊवारी साडी घालत पॅराजपींगचां राष्ट्रीय विक्रम शीतल महाजन यांनी प्रस्थापित केला आहे. हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथून पॅरामोटारच्या साहाय्याने पाच हजार फुटांवरून पॅराजंम्प केले असून नऊवारीत हा प्रयोग करणार्‍या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.

हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरमध्ये २६ जानेवारी रोजी पॅरामोटरिंग आणि एरो मॉडेलिंग या हवाई खेळांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. त्यात शीतल महाजन यांच्या पॅराजंम्पने नवीन विक्रमाची नोंद केली आहे. शीतल महाजन-राणे या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पणती असून त्यांनी डायव्हींगमध्ये अनेक विश्‍वविक्रमांची नोंद केलेली आहे. त्यांच्या नावावर १८ राष्ट्रीय आणि सहा जागतिक विक्रम प्रस्थापित आहेत. केंद्र सरकारतर्फे २०११ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जगातील सात खंडात स्कायडायव्हिंग करणार्‍या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.

Protected Content