दिलासादायक : जिल्ह्यात आज १६६ कोरोना बाधीत; ३९७ रूग्ण झाले बरे !

जळगाव : प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असून गत चोवीस तासांमध्ये १६६ बाधीत आढळून आले आहेत. तर दिवसभरात तब्बल ३९७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोना संसर्गाचा तयारीनिशी मुकाबला करताना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला रिकव्हरी रेट ९३. ७६ टक्क्यांवर गाठण्याचे यश मिळाले असताना आज निदान झालेल्या रुग्णांची संख्या १६६ निष्पन्न झाली. या जीवघेण्या चक्रव्यूहातून जिल्हा हळूहळू बाहेर पडत असल्याचा दिलासा खूप महत्वाचा आहे

जिल्ह्यात सातत्याने रूग्णसंख्येत घट होत असल्याचे दिलासादायक चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. हाच कल गत चोवीस तासांमध्ये कायम राहिला आहे. गत चोवीस तासांमध्ये १६७ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. तर ३९७ पेशंट बरे झाले आहेत. तर आज चार रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्याचा विचार केला असता जळगाव शहर-१४, जळगाव तालुका-३; भुसावळ-१६; अमळनेर-००; चोपडा-३; पाचोरा-७; भडगाव व धरणगाव-००; यावल-१०; एरंडोल-६४; जामनेर-१४; रावेर-३; पारोळा-८; चाळीसगाव-१९; मुक्ताईनगर व बोदवड प्रत्येकी २ आणि बाहेरच्या जिल्ह्यातील एक असे रूग्ण आढळून आले आहेत.

सर्व तालुक्यांमधील रूग्णसंख्या कमी झाली असतांना एरंडोलमध्ये मात्र संसर्ग वाढल्याचे आज दिसून आले आहे.

Protected Content